खगोलशास्त्रीय आॅलम्पियाड थायलंडमध्ये रंगणार
By admin | Published: May 9, 2017 01:44 AM2017-05-09T01:44:54+5:302017-05-09T01:44:54+5:30
खगोलशास्त्रीय खगोलभौतिक विषयावरील आंतरराष्ट्रीय आॅलंपियाडचे १२ ते २१ नोव्हेंबर २०१७ दरम्यान थायलंडमधील फुकेत येथे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खगोलशास्त्रीय खगोलभौतिक विषयावरील आंतरराष्ट्रीय आॅलंपियाडचे १२ ते २१ नोव्हेंबर २०१७ दरम्यान थायलंडमधील फुकेत येथे आयोजित करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१६ पासून या आॅलंपियाडकरीता संघ निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. भारतात टाटा इन्स्टिटयूट फॉर फंडामेंटल रिसर्च, मुंबई, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्यूकेशन या दोन संस्था अगदी सुरुवातीपासून खगोलशास्त्रीय आॅलंपियाडसाठी मुलांची निवड करणे आणि प्रशिक्षण देण्याचे काम करतात.
भौतिकशास्त्र शिक्षकांच्या भारतीय संघटनेने आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील परिक्षेमध्ये देशभरातील १६ हजार २२० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ५३१ विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्याच्या भारतीय राष्ट्रीय खगोलशास्त्रीय आॅलंपियाड परीक्षेसाठी निवड झाली होती.
भारतीय राष्ट्रीय खगोलशास्त्रीय आँलपियाड परिक्षा संपूर्ण देशभरात १८ केंद्रावर पार पडली. २२ एप्रिल ते ८ मे दरमयान एचबीसीएसई येथे आयोजित खगोल शास्त्रीय आॅलंपियाडसाठी अभिमुखता आणि निवड शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी या परिक्षेमधील ५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
या शिबिराचा समारोप सोमवारी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या व्ही.जी. कुलकर्णी सभागृहात पार पडला.