मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर खानपान व्यवस्थेसाठी राज्य सरकारने पुरवठादाराची नियुक्ती केली आहे. हे पुरवठादार अतिशय कमी दराने चविष्ट पदार्थ देणार आहेत. ४४ प्रकारचे खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट सर्वात कमी दर नमूद केलेल्या कंपनीलाच देण्यात आल्याचे प्रशासनने स्पष्ट केले आहे.
खर्चावरील तो वाद-अजित पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर खानपानाच्या नावाखाली उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला होता.-चार महिन्यात २ कोटी ६८ लाख रुपये खर्च केल्याची टीका पवार यांनी केली होती. त्यावर, ‘वर्षा’वर आलेल्या माणसाला चहाही पाजणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता
असे आहेत दर -
चहा - १८ कॉफी - १३ कोल्ड ड्रिंक - १५ इडली - २८ दोन दहीवडे - १५ दोन बटाटेवडे - २७ पावभाजी - २२पाण्याची बाटली - १५ फ्रूट सॅलड - १५व्हेज सँडविच - १८व्हेज सूप - १८नॉनव्हेज सूप - २०उपमा - २६साधा डोसा - १५