सध्या सरकारची अवस्था ICUमधील गंभीर रुग्णासारखी; एकनाथ खडसेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:02 PM2022-07-18T18:02:57+5:302022-07-18T18:03:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बरेच दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्यावरुन आता शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे यांनी देखील या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. सदर घटना अतिशय दुर्देवी असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
मी सदर अपघाताबाबत अधिकाऱ्यांशी बोललो, त्याबाबत माहिती घेतली, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. तसेच या घटनेची चौकशी झाली पाहिजे, माझी सरकारला ही विनंती आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसेच मध्य प्रदेशसारखे अपघात टाळण्यासाठी उपाय योजना काढायला हव्या, असं सांगत सध्या सरकारची अवस्था आयसीयूमधील गंभीर रुग्णासारखी आहे, अशी टीका एकनाथ खडेस यांनी केली.
१४ खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी?
एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी शिवसेनेच्या ४० खासदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजीमाजी नगसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. आज शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे.