राज ठाकरेंच्या विनंतीवरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, हे विसरु नये-संदीप देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:51 AM2022-04-30T11:51:05+5:302022-04-30T11:51:16+5:30

बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.

At the request of MNS chief Raj Thackeray, CM Uddhav Thackeray became the working president of Shiv Sena, said MNS leader Sandeep Deshpande. | राज ठाकरेंच्या विनंतीवरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, हे विसरु नये-संदीप देशपांडे

राज ठाकरेंच्या विनंतीवरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, हे विसरु नये-संदीप देशपांडे

Next

मुंबई- मनसे आणि भाजपचं  हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्य बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 

बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. याबरोबरच भाजपवर तुटुन पडा, त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजप आणि मनसे यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे जनतेला दाखवा, आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची मेमरी इरेज झाली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते, तेव्हा राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज्यभर दौरा करत होते. राज ठाकरे शिवसेना वाढवण्याचे काम करत होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांना विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केले, हे त्यांनी विसरु नये, अशी आठवण संदीप देशपांडे यांनी करुन दिली आहे. 

दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच पुढील आठवड्यात  उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर लगेच आठवड्याभरातच पुणे आणि औरंगाबाद या दोन सभा जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे १ मे  रोजी औरंगाबादमध्ये  ज्या मैदानात सभा घेणार आहेत. त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: At the request of MNS chief Raj Thackeray, CM Uddhav Thackeray became the working president of Shiv Sena, said MNS leader Sandeep Deshpande.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.