Join us

Atal Bihari Vajpayee : अंधेरा छटेगा, कमल खिलेगा! शिवाजी पार्कमध्येच घुमली होती भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 3:13 AM

तीन दशकांच्या संघर्षानंतरही भाजपा आणि तत्कालीन जनसंघाला संसदीय राजकारणात म्हणावा तसा विजय नोंदविता आला नव्हता. भरीसभर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधामुळे राजकीय अस्पृश्यतेचेही चटके पक्षाला बसत होते.

मुंबई : तीन दशकांच्या संघर्षानंतरही भाजपा आणि तत्कालीन जनसंघाला संसदीय राजकारणात म्हणावा तसा विजय नोंदविता आला नव्हता. भरीसभर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधामुळे राजकीय अस्पृश्यतेचेही चटके पक्षाला बसत होते. अशा पार्श्वभूमीवर १९८० साली मुंबईतभाजपाची स्थापना झाली. त्या वेळी शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या अमोघ वाणीतून ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा कमल खिलेगा...’ अशी भविष्यवाणी केली होती.दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरोधात लढणाऱ्या बिगर काँग्रेसी पक्षांनी जनता पार्टीची स्थापना केली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकारही बनले. मात्र, पुढे अंतर्गत विरोधात हे सरकार अडकले. तेव्हा जनसंघातील सदस्य आणि नेत्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या बांधिलकीवर अन्य नेत्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. त्या वेळी वांद्रे येथील समतानगर येथे नव्याने जन्माला आलेल्या भाजपाचे अधिवेशन पार पडले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना वाजपेयी यांनी जनसंघाच्या मुशीतून तयार झालेल्या आणि भाजपाच्या छत्राखाली जमलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा प्रचंड आशावाद जागविला. आपल्या अमोघ वाणीतून ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा कमल खिलेगा..’ असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी जागविला.विशेष म्हणजे भाजपाने जनसंघाच्या काळातील आपल्या आक्रमक हिंदुत्वाला मुरड घालत. गांधीवादी समाजवादाची कास धरली होती. या नव्या विचारसरणीतूनच भाजपा १९८४ च्या लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. मात्र, इंदिरा लाटेत भाजपाचा अक्षरश: दारुण पराभव झाला. देशभरातून फक्त दोन जागाच भाजपाला वाट्याला आल्या. या दारुण पराभवानंतर भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल पूर्णपणे खचले होते. तेव्हाही वाजपेयी यांनी देशभर सभा घेत पक्षात नवीन प्राण फुंकले. मुंबईत पाच उद्यान (फाइव्ह गार्डन) येथील सभेत ‘हम इलेक्शन हारे हैं, हिंम्मत नही हारे है. हमे सत्ता हथियाने के लिये झुंजना पडेगा. इसके लिये कोई शॉर्टकट नही हैं’ अशा शब्दांत वाजपेयी यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा लढण्यास सज्ज केले. विशेष म्हणजे त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा खासदारांची संख्या दोनवरून थेट ८५ वर गेली.भाजपाला आपल्या पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्वत: अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतांनी पराभूत झाले होते. तर, देशभर भाजपाचे दोनच खासदार निवडून आले होते. या स्थितीतूनही पक्षाला अटलजींच्या अमोघ वाणीने बाहेर काढले. फाइव्ह गार्डन येथे भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘‘हम इलेक्शन हारे हैं, हिम्मत नही हारे है. हमे सत्ता हथियाने के लिये झुंजना पडेगा. इसके लिये कोई शॉर्टकट नही हैं,’’ असा सल्ला वाजपेयी यांनी कार्यकत्यांना दिला होता.बम अमरिकी हो या रुसी, खून तो हमारा बहनेवाला हैवाजपेयी एक यशस्वी राजकीय व्यक्ती, पत्रकार होतेच, त्याहून ते उत्तम कवी होते. सामाजिक, सांस्कृतिक एकतेचा संदेश ते आपल्या कवितांमधून देत असत. त्यांच्या कवितांमधून ते विश्वशांतीचे प्रणेते असल्याचे दिसून येते.भारत-पाकिस्तान पड़ोसी, साथ-साथ रहना है,प्यार करें या वार करें, दोनों को ही सहना है,तीन बार लड़ चुके लड़ाई, कितना महँगा सौदा,रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है।जो हम पर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे।जंग न होने देंगे.ब्रिटिशांनी देश सोडताना भारताची फाळणी केली. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती कायम राहिली. दहशतवादाने भारताला सतत त्रास होत राहिला, शेकडो जवानांना हौतात्म्य आले, पण प्रश्न सुटलाच नाही. यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी कवितेतून भाष्य केले होते. महासत्तांकडून विकत घेतलेली शस्त्रे शेवटी आपलंच रक्त सांडणार आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ते युद्धविहिन जगाचे प्रणेते किंवा युद्धाविन जगाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ते म्हणत, हम जंग न होने देंगे!विश्व शांति के हम साधक हैं, जंग न होने देंगे!कभी न खेतों में फिर खूनी खाद फलेगी,खलिहानों में नहीं मौत की फसल खिलेगी,आसमान फिर कभी न अंगारे उगलेगा,एटम से नागासाकी फिर नहीं जलेगी,युद्धविहीन विश्व का सपना भंग न होने देंगे। जंग न होने देंगे.विश्वशांतीचे आम्ही साधक आहोत. आता आमच्या शेतांमध्ये मृत्यूचे पिक येणार नाही, नागासाकीसारखे भयानक परिणाम या जगाला पुन्हा भोगावे लागणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करु, अशा मताचे वाजपेयी होते.

टॅग्स :अटलबिहारी वाजपेयीमुंबईभाजपा