सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याला मिळाली परवानगी; कांदिवलीत होणार अनावरण

By मनोहर कुंभेजकर | Published: August 12, 2022 03:29 PM2022-08-12T15:29:33+5:302022-08-12T15:29:52+5:30

वाजपेयी यांच्या पुतळ्यास अटकाव करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत संसदेत हक्कभंग आणला आहे.

atal bihari Vajpayee's statue got permission unveiling will be held in Kandivali | सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याला मिळाली परवानगी; कांदिवलीत होणार अनावरण

सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याला मिळाली परवानगी; कांदिवलीत होणार अनावरण

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेली दीड वर्षे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा कांदिवली येथे पुतळा उभारण्यास महाआघाडी सरकारने परवानगी नाकारली होती.अखेर सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली आहे. कांदिवली (पूर्व), आकुर्ली रोड, समता नगर पोलीस चौकीजवळील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्रच्या (सेंटर ऑफ एक्सलन्स) संकुलात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या गेल्या अथक प्रयत्नानंतर उद्या सदर पुतळा साकारणार आहे. लोकमतने सातत्याने हा विषय मांडला होता.

 उद्या दि,13 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दहिसर चेक नाक्यावरून उत्तर मुंबईतील सुमारे 3000 भाजप कार्यकर्ते भव्य मिटवणुकीने कांदिवली येथे वाजपेयीं  यांचा पुतळा आणणार आहे.त्यांनंतर या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

 गेल्या दि,२५ डिसेंबर रोजी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त या पुतळ्याचे अनावरण होणार होते.पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या होत्या.मात्र आघाडी सरकारचे तत्कालीन क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी गेल्या दि,24 डिसेंबरला सदर पुतळा उभरण्यास परवानगी नाकारली होती. आपण गेली दीड वर्षे यांसाठी लढा दिला. आघाडी सरकार मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात अडथळा निर्माण केला.आपण व  निवडक भाजप कार्यकर्त्यांनी दि,28 डिसेंबर रोजी माजी  सुनील केदार यांच्या बंगल्यावर त्यांना  भेटण्यास गेलो असता  आपल्याला पोलिसांनी अटक केली. गेल्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई  भाजप अध्यक्ष,आमदार मंगलप्रभात लोढा यांनी खासदार शेट्टी यांची मुक्तता करा ही मागणी लावून धरत वाजपेयी यांच्या पुतळ्यास परवानगी नाकारणाऱ्या महाआघाडी सरकारचा निषेध करत हा मुद्दा त्यांनी  विधानसभेत उचलून धरला होता.

वाजपेयी यांच्या पुतळ्यास अटकाव करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत संसदेत हक्कभंग आणला आहे. मात्र मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या विनंतीवरून वाजपेयी यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण करणार आहे. अखेर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी वाजपेयी यांच्या पुतळा उभारण्यास परवानगी दिली अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.

Web Title: atal bihari Vajpayee's statue got permission unveiling will be held in Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.