‘अथर्वोत्सव’ने जिंकली मने

By Admin | Published: May 5, 2017 06:29 AM2017-05-05T06:29:07+5:302017-05-05T06:29:07+5:30

अथर्व स्कूल आॅफ फाइन आर्ट्स या संस्थेतर्फे माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन येथे ‘अथर्वोत्सव-२०१७’ हा सोहळा नुकताच

'Atharvatotsava' won by Manya | ‘अथर्वोत्सव’ने जिंकली मने

‘अथर्वोत्सव’ने जिंकली मने

googlenewsNext

 मुंबई : अथर्व स्कूल आॅफ फाइन आर्ट्स या संस्थेतर्फे माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन येथे ‘अथर्वोत्सव-२०१७’ हा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनी नाट्यम् समकालीन, नृत्यनाट्य, लोकनाट्य अशा विविध नृत्यांची मेजवानी नृत्यविशारद व नृत्यशौकिनांना मिळाली.
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. या सोहळ्यात नवीन होतकरू युवक कलाकारांना अथर्व स्कूल आॅफ फाइन आर्ट्समुळे उत्तम व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमाची वाहवा करताना नवोदित कलाकारांसाठी असे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचे आवाहन प्रमुख पाहुण्या व अभिनेत्री सुनीता राव बैल्लूर यांनी केले. या वेळी नाट्य दिग्दर्शक राजू रामनाथन आणि सुनीता राव बैल्लूर यांच्या हस्ते ज्येष्ठ आणि कनिष्ठ कलाकारांचा गौरव करण्यात आला.
दोन दशकांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलाकारांना ‘नृत्यनिपुण’, तर नवोदित कलाकारांना ‘नृत्यसाधक’ या सन्मानाने गौरवण्यात आले. तर अथर्व स्कूलतर्फे कार्यक्रमात सादरीकरण केलेल्या कलाकारांना सन्मानपत्र देऊन प्रोत्साहित केले गेले. कार्यक्रमात सामील झालेल्या एकूण ७५ कलाकारांनी विविध नृत्यप्रकारांनी उपस्थितांचे मनोरंजन करत वाहवा मिळवली, असे संस्थेच्या संस्थापिक शामल पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Atharvatotsava' won by Manya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.