माटुंग्यात रंगणार ‘अथर्वोत्सव २०१७’

By admin | Published: April 25, 2017 01:53 AM2017-04-25T01:53:02+5:302017-04-25T01:53:02+5:30

अथर्व स्कूल आॅफ फाईन आर्ट्सतर्फे विविध नृत्यप्रकारांचा संगम असणारा ‘अथर्वोत्सव २०१७’ रंगणार आहे. २९ एप्रिल रोजी हा महोत्सव

'Atharvotsav 2017' to be played in Matunga | माटुंग्यात रंगणार ‘अथर्वोत्सव २०१७’

माटुंग्यात रंगणार ‘अथर्वोत्सव २०१७’

Next

मुंबई : अथर्व स्कूल आॅफ फाईन आर्ट्सतर्फे विविध नृत्यप्रकारांचा संगम असणारा ‘अथर्वोत्सव २०१७’ रंगणार आहे. २९ एप्रिल रोजी हा महोत्सव माटुंगा आॅडिटोरिअम येथे सायंकाळी ६.३० ते १० या वेळेत रंगणार आहे. या महोत्सवाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
या महोत्सवात नृत्य नुपूर अकादमी ‘भरतनाट्यम्’, नृत्य तपस्या ‘कथ्थक’, गीतांजली ‘मोहिनीअट्टम’, नर्तनम डान्स ग्रुप ‘भरतनाट्यम्’, जी.एम. डान्स अकादमी ‘कन्टेम्पररी’, समिधास् इन्स्टिट्यूट आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स ‘सेमी क्लासिकल अ‍ॅण्ड फोक’ आणि सोपर्निका डान्स अकादमी ‘कुचीपुडी’ अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक नृत्यांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नृत्यांगना सुनीता राव बैलूर तर विशेष अतिथी म्हणून नाट्य लेखक आणि दिग्दर्शक रामू रामनाथन यांची उपस्थिती असेल.
हा महोत्सव सर्व नृत्यप्रेमींसाठी विनामूल्य असून, जास्तीतजास्त रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Atharvotsav 2017' to be played in Matunga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.