Join us

एटीएम डाटा चोरांच्या रडारवर

By admin | Published: October 07, 2015 5:03 AM

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डाटा चोरी करून त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करणाऱ्या लुटारूंच्या रडारवर आहे. गेल्या नऊ

- मनीषा म्हात्रे,  मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डाटा चोरी करून त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करणाऱ्या लुटारूंच्या रडारवर आहे. गेल्या नऊ महिन्यांत अशा प्रकारे तब्बल १८४ गुन्हे दाखल झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवसाला एक गुन्हा दाखल होत असून अशा असंख्य तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. मात्र अद्यापपर्यंत फक्त ५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नॅशनल क्राइम ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गेल्या वर्षी १८७९ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये ९४२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. २०१३ च्या तुलनेत याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. अशात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही या आरोपींनी टार्गेट केल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या ओघात आरोपीही टेक्नोसॅव्ही होत आहेत. अवघ्या ५० अमेरिकन डॉलर्समध्ये उपलब्ध होणारी स्किमर मशिन, त्यात मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारे एटीएम कार्ड यामुळे या ठगांना फसवणूक करणे सोयीचे होत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड फसवणुकीचे गुन्हे सर्वाधिक आहेत. मुंबईत काय घडते...एटीएममधून ५०० किंवा हजार रुपये गायब झाले की खातेधारकाचे सहसा त्याकडे लक्ष जात नाही. लक्ष गेले तरी पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचे टाळले जाते. एटीएम पिन अथवा कार्ड बदलून नव्याने एटीएम वापरणे सुरू राहते. त्यातही एखादा तक्रारदार पुढे गेलाच तर संबंधित पोलीस ठाणे तक्रार घेऊन त्याकडे कानाडोळा करताना दिसते. केवळ तक्रार अर्ज घेऊन पोलीस हात वर करतात. त्यामुळे सहसा खातेदारांनी याबाबत जागरूक राहणे गरजेचे ठरते.सुरक्षा यंत्रणेचा अभावएटीएम सेंटरबाहेरील सुरक्षेबाबत संबंधित प्रशासन अजूनही सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणात संबंधित बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये दोष आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली. सोपा पिन क्रमांक वापरणेत्यातही जेवढ्या सोप्या अंकाचा एटीएम पिन क्रमांक असेल तितकेच खातेदारांचे कार्ड सुरक्षित राहणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातही एटीएम मशिनमध्ये पिन क्रमांक टाइप करत असताना, आजूबाजूला कोणी आहे का, हे पाहण्याऐवजी एका हाताने की-पॅड झाकून पिन क्रमांक दाबणे योग्य ठरते. उदा. जर ४५५४ अशा क्रमांकाचा सोपा पिन क्रमांक असेल तर बोटांच्या हालचालीही कमी होतील, जेणेकरून आरोपी ठगांना हा पिन क्रमांक समजणार नाही. पिन क्रमांकाशिवाय लुटारू काहीही करू शकत नाहीत.स्किमर म्हणजे नक्की काय?स्किमर मशिन हे असे डिव्हाइस आहे, की ज्यामध्ये मेमरी कार्ड आणि कार्ड रीडर असते. हे स्किमर मशिन एटीएम मशिनच्या कार्ड स्वाइपसाठीच्या स्लॉटभोवती वापरले जाते. अशा मशिनमध्ये खातेदारांनी कार्ड स्वाइप केल्यास त्यांचा डाटा या स्किमर मशिनमध्ये कैद होतो. या डाटाच्या आधारे लुटारू बनावट कार्डच्या आधारे खात्यातून पैसे काढतात. लुटारूंना सध्या हे मशिन सहज उपलब्ध होत आहे. महत्त्वाच्या घटनाजून २०१३ - कुलाबा येथील पोलिसांच्या मुख्यालयात असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये स्किमर मशिन लावण्यात आले होते. ऐन पगाराच्या दिवशी स्किमर मशिनच्या साहाय्याने लाखो रुपये लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती.२० आॅगस्ट २०१५ - जोगेश्वरी येथील एका एटीएम सेंटरमध्ये स्किमर मशिनद्वारे नागरिकांच्या खात्यातून लाखो रुपये चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.