राव यांच्या भोवतालचे वातावरण अमानवी, क्रूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:46+5:302021-01-21T04:07:46+5:30
राव यांच्या भोवतालचे वातावरण अमानवी व क्रूर वकिलांचा युक्तिवाद राव यांच्या भोवतालचे वातावरण अमानवी, क्रूर वकिलांचा युक्तिवाद लोकमत न्यूज ...
राव यांच्या भोवतालचे वातावरण अमानवी व क्रूर
वकिलांचा युक्तिवाद
राव यांच्या भोवतालचे वातावरण अमानवी, क्रूर
वकिलांचा युक्तिवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ कवी वरावरा राव यांना सध्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणचे वातावरण अमानवी व क्रूर आहे. त्यामुळे न्यायालयाने घटनेचे अनुच्छेद २२६ अंतर्गत विशेषाधिकारांचा वापर करत राव यांची जामिनावर सुटका करावी, अशी विनंती राव यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात बुधवारी केली.
राव हे कवी असून, ते एल्गार परिषद प्रकरणी आरोपी आहेत. त्यांना तळोजा कारागृहात ठेवले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सध्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळोजा कारागृहात पुरेशी वैद्यकीय सुविधा नसल्याने राव यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्या पत्नी हेमलता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.
जीवन जगण्याचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यांना ज्या परिस्थितीत ठेवण्यात आले आहे, ती स्थिती अमानवी, अमानुष आणि क्रूर आहे. त्यामुळे न्यायालयाने घटनेचे अनुच्छेद २२६ अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करावा, अशी विनंती राव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला केली.
‘त्यांचे (राव) वय व प्रकृती याचा विचार करून युक्तिवाद करा,’ असे न्यायालयाने म्हटले. दरम्यान, एनआयए व सरकारी वकिलांनी राव यांची प्रकृती चांगली असून, त्यांना तळोजा कारागृहात पाठविण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली.
..................
न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी ठेवली.