आठ महिन्यांत ३६५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:08 AM2021-09-22T04:08:37+5:302021-09-22T04:08:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या आठ महिन्यांत ३६५ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर, ७१६ मुलींच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या आठ महिन्यांत ३६५ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर, ७१६ मुलींच्या अपहरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या चार हजार ५३९ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी तीन हजार ५०७ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
२०१९ मध्ये सहा हजार ४३८ गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, ५ हजार ३२८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती. शहरात दिवसभरात दाखल होणाऱ्या अत्याचाराच्या सरासरी तीन गुह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुन्ह्यावर आले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यावर आली असली तरीही जूननंतर परिस्थिती जैसे थे होती.
गेल्या वर्षभरात ४४५ मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी ४१९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एकूण ६१९ अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यात अल्पवयीन मुलींसंदर्भातील ३६५ गुह्याचा समावेश आहे. तर, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाप्रकरणी ७१६ गुन्हे नोंद झाले असून ५८६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
चौकट
गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ
गेल्या वर्षी याच ८ महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या बलात्कारप्रकरणी २६४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०१ ने वाढ झाली आहे.....
३३२ गुन्ह्यांची उकल
अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेत दाखल ३६५ गुन्ह्यांपैकी ३३२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या ८ महिन्यांत दाखल गुन्हे
दाखल गुन्हे गुन्हे उकल
बलात्कार ६१९ ४९७
अपहरण ७२३ ५८९
....