Join us

अंबोलीत सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 05:16 IST

सहा वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना रविवारी रात्री अंबोलीत घडली.

मुंबई : सहा वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना रविवारी रात्री अंबोलीत घडली. परिसरातील एका महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर, तिच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढचा अनर्थ टळला. या प्रकरणी चौदा वर्षांच्या मुलाला अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले.अंबोलीच्या रमेशनगरात राहणाऱ्या दाम्पत्याची सहा वर्षांची पिंकी (नावात बदल) रविवारी दारात खेळत होती. शेजारी राहाणाºया मुलाने ‘तुझे बाबा तुला बोलवत आहेत,’ असे सांगत तिला सोबत नेले. निर्जन झाडीत नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. शेजारच्या इमारतीतील महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्याने, तिने नियंत्रण कक्षाला फोन केला. अंबोली पोलिसांनी तेथे येऊन मुलाला ताब्यात घेत, पिंकीची सुटका केली.