वर्सोवा येथे तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:07 AM2021-09-26T04:07:19+5:302021-09-26T04:07:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी येथील वर्सोवा परिसरातील डीजे वादक बिलाल शेख (२६) याने लग्नाचे प्रलोभन दाखवून एका ...

Atrocities on a young woman in Versova | वर्सोवा येथे तरुणीवर अत्याचार

वर्सोवा येथे तरुणीवर अत्याचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरी येथील वर्सोवा परिसरातील डीजे वादक बिलाल शेख (२६) याने लग्नाचे प्रलोभन दाखवून एका २५ वर्षीय तरुणीवर गेल्या अनेक महिन्यापासून अत्याचार करत त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर झीरो एफआयआर दाखल करत नंतर ते वर्सोवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

फेसबुकवरून सप्टेंबर, २०१९ रोजी पीडितेची शेखसोबत मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याचदरम्यान शेखचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा असल्याची माहिती पीडितेला मिळाली. तिने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरवात केली. हे त्याच्या लक्षात येताच तो त्याच्या पत्नीपासून लांब राहत असून लवकरच तिला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर तो लग्न करणार असल्याचे त्याने पीडितेला सांगितले. त्यानंतर शेखने पीडितेला ऑक्टोबर २०२० मध्ये वर्सोव्यातील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. त्यानंतर तिने त्याला लग्नाची विचारणा केल्यावर त्याने नकार दिला. तसेच तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली आणि लाखो रुपये तिच्याकडून उकळले. याप्रकरणी तिने ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र घटना वर्सोव्यातील असल्याने ओशिवरा पोलिसांनी ती वर्सोवा पोलिसांना वर्ग केली.

Web Title: Atrocities on a young woman in Versova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.