एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांना उत्तराधिकारीच मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 04:24 AM2020-09-14T04:24:17+5:302020-09-14T04:24:39+5:30

बदल्यांचा नवीन ‘लॉट’ निघेपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. पुढील आठवड्याभरात उपमहानिरीक्षक, अधीक्षक, उपायुक्तांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ही दुरुस्ती केली जाण्याची शक्यता आहे.

ATS chief Deven Bharti has no successor! | एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांना उत्तराधिकारीच मिळेना!

एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांना उत्तराधिकारीच मिळेना!

Next

- जमीर काझी

मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख देवेन भारती यांच्या बदलीला पंधरवडा होत आला तरी अद्याप त्यांनी पदभार सोडलेला नाही. राज्य सरकारने त्यांचा उत्तराधिकारी निश्चित केलेला नाही. त्यामुळे त्यांना पद सोडता आलेले नाही.
बदल्यांचा नवीन ‘लॉट’ निघेपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. पुढील आठवड्याभरात उपमहानिरीक्षक, अधीक्षक, उपायुक्तांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ही दुरुस्ती केली जाण्याची शक्यता आहे.
आयपीएसच्या बदल्यांचा ‘मुहूर्त’ पहिल्यांदा कोरोना विषाणूमुळे तर कधी आघाडीतील नेत्यांतील मतभेद व पोलीस महासंचालकांच्या विरोधामुळे लांबला. अखेर गणेशोत्सवानंतर २ व ३ सप्टेंबरला जवळपास ४७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
या बदल्यांच्या यादीत दिलेल्या सूचनांमध्ये देवेन भारती यांची एटीएसमधून बदली करण्यात येत असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जारी केले जातील, असे नमूद केले होते. मात्र, त्यांच्या जागी कोणत्याही अन्य अधिकाºयाची नेमणूक केली नव्हती. त्यामुळे भारती यांनी आपला पदभार सुपुर्द करण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही.

हे अधिकारी दुर्लक्षितच
- अप्पर महासंचालक सुखविंदर सिंग हे गेली सहा वर्षे फोर्सवनमध्येच आहेत. एडीजीच्या प्रमोशनला ‘ड्यु’ असलेले मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांची तेथून बदली केली. मात्र, त्यांना अद्याप पदोन्नती किंवा पोस्टिंग देण्यात आलेली नाही.
- राज्यात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पदोन्नतीचे आदेश निघून ७ महिने झाले असले, तरी अद्याप त्यांना एनएनसीच्या उपायुक्त पदावर कार्यरत ठेवण्यात आले आहे.

Web Title: ATS chief Deven Bharti has no successor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस