अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने परिचारिकेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:06 AM2021-04-22T04:06:30+5:302021-04-22T04:06:30+5:30

एलिझाबेथ रुग्णालयाच्या कोरोना केंद्रातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे भीतीने काेराेनाबाधित रुग्णाने ...

Attack on a nurse for not being admitted to the intensive care unit | अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने परिचारिकेवर हल्ला

अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने परिचारिकेवर हल्ला

Next

एलिझाबेथ रुग्णालयाच्या कोरोना केंद्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे भीतीने काेराेनाबाधित रुग्णाने अतिदक्षता विभागात दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्याला दाखल न केल्याच्या रागात, त्याने परिचारिकेवर हल्ला करून पळ काढल्याची घटना एलिझाबेथ रुग्णालयातील कोविड केंद्रात घडली. पोलिसांनी रुग्णाचा शोध घेऊन त्याला वरळी कोविड सेंटरमध्ये दाखल केले.

परिचारिका किरकोळ जखमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलीस अधिक तपास करत आहेत.

एन. एम. जोशी मार्ग परिसरात संबंधित रुग्ण राहण्यास आहे. १३ एप्रिलला त्याला एलिझाबेथ रुग्णालयातील कोरोना केंद्रात दाखल करण्यात आले होते. १५ एप्रिलला त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे त्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र तेथे आलेल्या परिचारिकेने त्याला तपासून अतिदक्षता विभागाची आवश्यकता नसल्याचे सांगितले. याच रागातून मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने परिचारिकेवर चाकूने हल्ला केला. परिचारिकेला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टरांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथून पळ काढला.

घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तपासावेळी काही अंतरावरच हा रुग्ण रस्त्यावर फिरताना दिसताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वरळीच्या कोविड सेंटरमध्ये हलवले. ताे कोरोनामुक्त झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

.....................................

Web Title: Attack on a nurse for not being admitted to the intensive care unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.