हाफ फ्रायचे कसले पैसे रे, म्हणत सुऱ्याने केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:55 PM2023-10-11T13:55:30+5:302023-10-11T13:55:56+5:30

हा सगळा प्रकार ऑर्डरचे पैसे मागितल्यावरून घडला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

attacked by saying what kind of money for half fries | हाफ फ्रायचे कसले पैसे रे, म्हणत सुऱ्याने केला हल्ला 

हाफ फ्रायचे कसले पैसे रे, म्हणत सुऱ्याने केला हल्ला 

मुंबई : गोरेगाव पश्चिमच्या हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या संजू तलावडे नामक इसमावर मालाड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याने एका अंडा भुर्जी स्टॉल चालकावर चाकूने हल्ला करत जखमी केली. हा सगळा प्रकार ऑर्डरचे पैसे मागितल्यावरून घडला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

मालाड पश्चिम येथे अरविंद पटेल यांचा अंडा भुर्जीचा स्टॉल आहे. नेहमीप्रमाणे स्टॉलवर उभे होते. त्यावेळी त्यांच्या परिचयाचा असलेला तलावडे त्या ठिकाणी आला. त्याने पटेल यांना अंडा भुर्जी आणि अंडा हाफ फ्राय बनवण्याची ऑर्डर दिली. 

सुऱ्याने केला हल्ला -
अरविंद पटेल यांनी त्याला शिवीगाळ करू नकोस असे बजावल्यावर तलावडेने स्टॉलवर असलेला कांदा कापण्याची सुरा उचलला आणि त्याने पटेल यांच्या डाव्या हातावर तसेच मानेवर वार केले. यात गंभीर होऊन पटेल खाली कोसळले. इतक्यात शेजारी असलेल्या एका महिलेला त्यांनी आवाज दिला आणि ती त्याच्या दिशेने धावली. जे पाहून तलावडेने दोबारा मेरे से पैसा मांगा तो जान से मार डालुंगा असे म्हणत हल्ल्यासाठी वापरलेला चाकू घेऊन गोरेगाव लिंक रोडच्या दिशेने पळ काढला. पटेल यांना स्थानिकांनी शताब्दी रुग्णालयात हलवले. तिथून त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. हाताला झालेल्या जखमेमुळे डॉक्टरांना पटेलवर शस्त्रक्रिया करावी लागली.
 

Web Title: attacked by saying what kind of money for half fries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.