कलाकारांना लुटणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:13 AM2018-05-21T02:13:54+5:302018-05-21T02:13:54+5:30

शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई : नवोदितांची करायचा फसवणूक

Attacks of artists robbery | कलाकारांना लुटणारा अटकेत

कलाकारांना लुटणारा अटकेत

Next


मुंबई : एका बड्या प्रोडक्शन हाउसमध्ये सहनिर्माता म्हणून काम करणाऱ्या जिग्नेश कोळी (२९)ला शिवाजी पार्क पोलिसांनी रविवारी अटक केली. बड्या प्रोडक्शन हाउसमध्ये सहनिर्माता असताना कौटुंबिक कारणामुळे नोकरी सुटली. त्यानंतर त्याने अ‍ॅक्टर होण्यासाठी मुंबईत येणाºया नवोदित कलाकारांनाच टार्गेट केल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. टिटवाळा येथील रहिवासी असलेला कोळी हा एका प्रोडक्शन हाउसमध्ये सहनिर्माता म्हणून काम करायचा. कौटुंबिक कारणामुळे त्याची नोकरी सुटली. याच दरम्यान, मुंबईत अभिनेता, अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन येणाºया तरुण-तरुणींना त्याने टार्गेट केले. नवोदित कलाकार मुंबईत कुठे व कसे येतात? कुणाला भेटतात? याबाबत त्याला माहिती होती. त्यातूनच त्याने अशा मुलांचे प्रोफाइल शोधण्यास सुरुवात केली. त्यातून बड्या घरातील मुलांना त्याने टार्गेट केले. या मुलांना मुंबईतील हॉटेल, कफे या ठिकाणी बोलावायचे. आॅडिशनच्या नावाखाली त्यांना बाहेर पाठवून त्यांच्या महागड्या वस्तू घेऊन तो पसार होत असल्याची माहिती त्याच्या चौकशीत समोर आली आहे.
अशाच प्रकारे त्याने सातारा येथील रहिवासी असलेल्या निरंजन श्रीपाद जोशी (२२), या तरुणाला हेरले. १५ मार्चला त्याला व्हॉट्सअ‍ॅपवरून आॅडिशनसाठी येण्यास सांगितले. त्याने एका नामांकित मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत काम देण्याचे आमिष दाखवले. दोन भेटीनंतर १० एप्रिल रोजी त्याने दादर येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. पुढे त्याला थंडपेय आणण्यास सांगून जोशीचा मोबाइल घेऊन तो पसार झाला होता. जोशीने त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा काहीही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्या आरोपीने स्वत:चे नाव राज म्हणून सांगितले होते. अखेर शिवाजी पार्क पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत हा उघडकीस आला. त्याने अशाप्रकारे अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Attacks of artists robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.