Join us

राज्यभरात पोलिसांवर हल्ले सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:37 PM

६९ गुन्हे १६१ आरोपींना बेडया, लातूरमध्ये सर्वाधिक ५ गुन्हे, डोंगरीमध्ये पोलिसला फरफटत नेले.

मुंबई : लॉकडाऊनसह विविध आदेशांची अंमलबजावणी करणाºया पोलिसांवर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले होत असल्याचे चित्र कायम आहे. गेल्या दोन दिवसांत ९ गुह्यांची वाढ होत हा आकडा ६९ वर पोहचला आहे. यात लातूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे.

२३ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूण देशात तीन आठवड्यांचा लॉकडाउन सुरू झाला. लॉकडाउनसह राज्याराज्यांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. महाराष्ट्रात जमाबंदी आदेश लागू आहेत. अशात  विविध आदेशांची अंमलबजावणी करणाºया पोलिसांवर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले करण्यात येत आहे. एकीकडे आपल्या कुटुंबियांची चिंता न करता केवळ नागरिकांसाठी हातात काठी घेत पोलीस् मुंबईच्या रस्त्यावर फिरत आहे.  कोरोनास्नाही लागण होवू नये म्हणून विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्याना अडविल्याच्या रागात त्यांनाच टार्गेट केले जात आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत राज्यभरात तब्बल ६९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याप्रकरणांत एकूण १६१ जणांना अटक करण्यात आली आहे. बंदोबस्तासह विविध कामाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. अशात होणारे हल्ले पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. 

आतापर्यन्तच्या दाखल गुह्यांत लातूर (६), उस्मानाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी ४ गुन्हें नोंद केले आहे. यात जळगावमध्ये दाखल झालेल्या दोन गुह्यांत ७३ जणांना तर सोलापूरमध्ये २२  जणांना अटक करण्यात आली आहे. अशात रायगड, अहमदनगर, औरंगाबाद ग्रामीण, नागपुर ग्रामीण आणि गोंदिया वगळता सर्व जिल्हे आणि शहरात गुह्यांची नोंद आहे. पोलिसांनीही अशा व्यकतींची धरपकड़ करत त्यांची रवानगी कोठड़ीत केली आहे. त्यामुळे पोलिसांवर हात उगारणयापूर्वी ते कुणासाठी बाहेर आहेत याचा थोडासा विचार करा असे पोलीस कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून या घटनांबाबत तीव्र निषेध वर्तविन्यात येत आहे. 

.................................

डोंगरीत पोलिसाला फरफटत नेले...

मुंबईतही पोलिसांवरील हल्ले सुरुच आहेत.  धारावीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवाजी नगरमध्ये गर्दी पांगविन्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबुने मारहाण करण्यात आली होती. त्यापाठोपाठ भेंडीबाजार येथेही  नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका विनाकारण भटकणाऱ्या दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी चालकाने न थांबता पोलिसालाच फरफटत नेले. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास पूर्व मुक्त मार्गावर नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र धुरत (४०) यांनी दुचाकी चालकास अटकाव केला. मात्र दुचाकी न थांबवता धुरत यांना फरफटत नेल्याची घटना घडली. यात ते जखमी झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस