Join us

भूखंड घेण्याचा सेनेचा प्रयत्न फसला

By admin | Published: May 14, 2016 1:27 AM

विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपा युतीमध्ये आखाडा रंगल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मुद्द्यावर उभय पक्ष मैदानात उतरले आहेत़ भूखंडाचा गैरवापर होत

मुंबई : विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपा युतीमध्ये आखाडा रंगल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मुद्द्यावर उभय पक्ष मैदानात उतरले आहेत़ भूखंडाचा गैरवापर होत असल्याने एमसीएचे कांदिवली येथील मैदान ताब्यात घेण्याचे फर्मान युवराजांनी सोडले आहे़ मात्र शिवसेनेच्या हातावर तुरी देत मित्रपक्ष भाजपाने सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविला़२००४ मध्ये पालिकेने एमसीएला कांदिवली येथील महावीर नगरमध्ये ४२ हजार २९० चौ़मी़चे खेळाचे मैदान क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी दिले़ मात्र या जागेवर मनोरंजन क्लब तयार करण्यात आल्याने एमसीए वादात सापडले़ याची शहनिशा करण्यासाठी सुधार समितीने जानेवारी महिन्यात या क्लबची पाहणी केली़ यात नियमांचे उल्लंघन करून या जागेचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने एमसीएला पालिकेने नोटीस बजावली़ एमसीएकडे असलेला भूखंड ताब्यात घ्यावा, असे मत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार खासगी संस्थांकडे असलेले २१६ मनोरंजन व खेळाची मैदाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे़ त्यामुळे भाजपा नेत्यांचे वर्चस्व असलेल्या एमसीएचा भूखंड परत घेण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू होत्या़ मात्र शिवसेनेला जाग येण्याआधीच एमसीएचा भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव भाजपाने सुधार समितीमध्ये रेकॉर्ड केला़ त्यामुळे हा भूखंड ताब्यात घेण्याचे शिवसेनेचे स्वप्न तूर्तास भंगले आहे़ (प्रतिनिधी)