धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न? उद्धव ठाकरेंचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 07:32 AM2018-12-05T07:32:16+5:302018-12-05T07:35:30+5:30

गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. 

Is the attempt to reinforce the bloody 'pattern' of voting by religious frenzy? The question of Uddhav Thackeray | धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न? उद्धव ठाकरेंचा सवाल  

धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न? उद्धव ठाकरेंचा सवाल  

Next
ठळक मुद्देकथित गोहत्येच्या मुद्द्यावरून बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशमधील 80 जागा या लोकसभा निवडणुकीत निर्णायक आहेतया 80 जागांसाठीच  गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. 

मुंबई - कथित गोहत्येच्या मुद्द्यावरून बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशमधील 80 जागा या लोकसभा निवडणुकीत निर्णायक आहेत. या 80 जागांसाठीच  गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे. 

 सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागे काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले होते. या दंगलीत एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य एकाचा मृत्यू झाला होता. या दंगलीमागच्या मुख्य सूत्रधाराला मंगळवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनामधील अग्रलेखातून बुलंदशहरमधील हिंसाचार प्रकरणी भाजपावर जोरदार टीका केली आहे. 

"उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 80 पैकी 71 जागा जिंकल्यानेच 2014 मध्ये भाजपचे केंद्रातील बहुमताचे सरकार होऊ शकले. मात्र 2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. त्यात सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे ‘कैराना’ लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीपूर्वी जसे ‘मुज्जफरनगर’ आणि मध्यंतरी ‘कैराना’ घडवले गेले तसे आता ‘बुलंदशहर’ घडवून आणले जात आहे का?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील निर्णायक 80 जागांसाठी गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

''बुलंदशहरातील हिंसाचारावरून मोदी यांनी कान उपटूनही तथाकथित गोरक्षकांचा उन्माद कमी झालेला नाही हेच  दिसते. तसेच गोरक्षणाच्या नावाने उन्माद करणाऱयांनाही नंतर कायद्याचे दंडुके, तुरुंगवासाचे चटके सहन करावे लागतात. मात्र गोरक्षणाच्या आडून हिशेब चुकते करणारे आणि त्याद्वारा धार्मिक धृवीकरण घडवून मतांच्या पोळय़ा भाजून घेणारे नामानिराणे राहतात,'' असेही उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 

Web Title: Is the attempt to reinforce the bloody 'pattern' of voting by religious frenzy? The question of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.