व्यापाऱ्याला अटक; बिघडलेल्या माेबाइलचे पैसे परत न दिल्याचा राग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोबाइलच्या दुकानातून खरेदी केलेला सेकंडहॅन्ड फोन त्याच संध्याकाळी बिघडला. मात्र दुकानदाराने ग्राहकाचे पैसे परत करण्यास नकार दिला. यामुळे ग्राहकाने रागाने त्याला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य सहकाऱ्यांनी याबाबत प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी जोगेश्वरीतील मलिक खान (५०) या मार्बल व्यापाऱ्याला गुरुवारी अटक केली.
बोरीवलीच्या इंद्रप्रस्थ मॉलमधील नरेंद्र प्रजापती यांच्या मोबाइलच्या दुकानातून गुरुवारी सकाळी खानने साडेतीन हजार रुपयांत एक मोबाइल खरेदी केला. मात्र तो संध्याकाळी बिघडला. खानने लगेचच दुकानात जाऊन त्याबाबत प्रजापतीला सांगितले तसेच पैसे परत मागितले. मात्र प्रजापतीने खानसोबत हुज्जत घालून पैसे परत देण्यास नकार दिला. तेव्हा चिडलेल्या खानने सोबत आणलेली बंदूक काढून ती प्रजापतीच्या कानपटीवर लावली. मात्र प्रजापतीच्या सहकाऱ्यांनी याची माहिती मॉलमधील अन्य व्यापारी, सुरक्षा यंत्रणा व पोलिसांना दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून बंदूकही जप्त करण्यात आली.
.........................