ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 04 - रेल्वे सुरक्षा बलाच्या बलविंदर सिंग या शिपायाने शनिवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबई सेंट्रल येथील कॅशरुम मध्ये सिंगने स्वत: वर गोळी झाडली.
अन्य सहकाऱ्यांनी सिंगला तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.