Join us

पत्नीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 1:19 AM

दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीची बेदम मारहाण करून हत्या करून एका तरुणाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़

मुंबई : दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीची बेदम मारहाण करून हत्या करून एका तरुणाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ सायन येथील प्रतीक्षानगरमध्ये ही घटना घडली. कोमल संजयकुमार भटेल (वय २०) असे मृत पत्नीचे नाव असून याप्रकरणी तिचा पती संजयकुमार याला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली.गेल्या आठवड्यात त्याने आजारी पत्नीला मारहाण केली़त्यानंतर ब्लेडने नस कापून तेथेच पडून राहिला होता. एका नागरिकाने त्याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर दोघांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. संजय कुमारवर वेळीच उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले. त्याचा ११ महिन्यांपूर्वी कोमलशी विवाह झाला.दारूचे व्यसन असल्यानेत्यांच्यात नेहमी वाद होत होते. कोमल आजारी असताना तिला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत संजयकुमारवर खून व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून २८ मेपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.