लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सिगारेट विकत घेऊन दिली नाही म्हणून दुकलीने आसिफ शेख (२४) या तरुणावर प्राणघातक हल्ला चढविला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
आसिफ शिवाजी नगर परिसरात कुटुंबीयांसोबत राहत आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुकलीने त्याला अडवून त्याच्याकडे सिगारेटची मागणी केली. सिगारेट दिली नसल्याच्या रागातून त्याच्या डोक्यात तलवारीने वार केले. नागरिक जमताहेत पाहून आरोंपीनीं पळ काढ़ला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी शेखला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. शेखच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.