Join us

अल्पवयीन मुलीचे तोंड, हात बांधून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

कुटुंबियांना मुलीला पळवून नेण्याची धमकी, बोरवलीतील घटनाअल्पवयीन मुलीचे तोंड, हात बांधून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्नबोरिवलीतील घटना; कुटुंबीयांना मुलीला ...

कुटुंबियांना मुलीला पळवून नेण्याची धमकी, बोरवलीतील घटना

अल्पवयीन मुलीचे तोंड, हात बांधून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

बोरिवलीतील घटना; कुटुंबीयांना मुलीला पळवून नेण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरात १७ वर्षीय मुलगी एकटी झोपली असल्याचे पाहून भाडेकरू तरुणाने तिचे तोंड, हात बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात घडली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी भाडेकरू तरुण अवध साहनी (३२) विनयभंग, पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.

बोरिवली परिसरात तक्रारदार १७ वर्षीय तरुणी आई-वडिलांसोबत राहण्यास आहे. २८ जानेवारीला ती घरात एकटी झोपली असताना, अवधची तिच्यावर वाईट नजर पडली. त्याने मुलीचे तोंड, हात बांधून तिला विवस्त्र करून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने त्याला लाथ मारून आरडाओरड केली असता ताे पळून गेला. तरुणीने बांधलेले हात, तोंड सोडवून आई-वडिलांना घटनेची माहिती दिली.

अवधने मुलीच्या आई-वडिलांना कॉल करून याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. कुटुंबीयांनी शनिवारी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. अवध हा प्लम्बर आहे.