Join us  

मंत्रालयाबाहेरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 1:24 PM

मंत्रालयाबाहेरच एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी शेतकऱ्याकडील रॉकेल जप्त करुन त्यास ताब्यात घेतलं.

ठळक मुद्दे75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पीडित शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबई - देशात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्यात येत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभक्ती आणि देशप्रेमाचा उत्साह दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर, राज्यातील जनतेला संबोधित करताना, कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर काही वेळातच मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियातून समोर आला आहे.   मंत्रालयाबाहेरच एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी शेतकऱ्याकडील रॉकेल जप्त करुन त्यास ताब्यात घेतलं. वारंवार मागण्या करुनही आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, म्हणून आपण आत्महत्येचा पाऊल उचलल्याचं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. 

75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पीडित शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आपल्या मूलभूत हक्कांचा वापर करत शेतकरी सरकारविरुद्ध आंदोलन करतो, आपलं मत मांडतो, आपल्यावरील अन्याय शासन दरबारी सांगतो. मात्र, कुठेतरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच शेतकरी असे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. दरम्यान, यापूर्वीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे झाली. मात्र, अद्यापही येथील शेतकरी, कामगार स्वातंत्र्यापासून वंचित असल्याची भावना या वर्गाकडून व्यक्त होत आहे.  

टॅग्स :शेतकरीमुंबईमंत्रालय