Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 07:18 PM2020-09-16T19:18:03+5:302020-09-16T19:18:47+5:30

शिक्षक आपल्या मागणीवर ठाम असून आताच अध्यादेश काढण्याचं शिक्षकाची अट आहे. 

Attempted suicide at MLA's residence due to non-receipt of teacher's salary | Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देघटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे दाखल झाले असून ते समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.


मुंबई - आमदार निवास येथे एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पथक दाखल झाले असून गजानन खैरे नावाच्या शिक्षकाने वेतन मिळत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे दाखल झाले असून ते समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी लेखी आश्वासन देण्याचे देखील त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र, शिक्षक आपल्या मागणीवर ठाम असून आताच अध्यादेश काढण्याचं शिक्षकाची अट आहे.

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षक आत्महत्येचा प्रयत्न करत असून पोलीस आणि नाना पटोले देखील समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शिक्षक आपल्या मागणीवर ठाम आहे. गजानन खैरे मूळचे औरंगाबादचे आहेत. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी याआधी ही त्यांनी नाशिक ते विधानभवन मुंबई पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा त्यांना मध्येच थांबविण्यात आले आणि यावर उपसमिती स्थापन करून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याचाच पाठपुरावा करण्यासाठी काही दिवसांपासून ते आमदार निवासात होते आणि अखेर आज त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

 

Web Title: Attempted suicide at MLA's residence due to non-receipt of teacher's salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.