मुंबई : चेंबूरमध्ये एका अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. रामचंद्र जाधव (19) व सुरेश खाबळे (22) अशी या तरुणांची नावे असून ते अॅण्टॉप हिल येथे वास्तव्यास होते. कारने दिलेल्या धडकेत या दोघांचा बळी गेला़ मात्र या वेळी पाठीमागून जाणा:या व्यावसायिकाच्या दक्षतेमुळे घटना घडल्यानंतर पळ काढणारा आरोपी कारचालक इरफान शेख (3क्) याला टिळक नगर पोलिसांनी अटक केली .
महेश गुप्ता असे व्यावसायिकाचे नाव असून त्याचा मानखुर्दमध्ये मोबाइल रिपेरिंगचा व्यवसाय आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जाधव व खाबळे दुचाकीवरून अॅण्टॉप हिल येथून चेंबूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी गुप्ता हे त्यांचा मित्र राजेंद्र यादवसोबत याच मार्गाने जात होते. मात्र जाधव हे एका गाडीला ओव्हरटेक करत असल्याचे बघूनही आरोपी शेखने त्याच्या गाडीचा वेग कमी केला नाही़ तेवढय़ातच शेखच्या गाडीने जाधवच्या दुचाकीला धडक दिली़ त्यानंतर त्या दोघांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आल़े डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
मात्र गुप्ता यांनी तत्परता दाखवत थेट शेखच्या गाडीचा पाठलाग केला़ वेळ न दवडता गुप्ता यांनी शेखच्या कारच्या नंबरची नोंद करून घेतली़ ही नोंद करून घेत असताना गुप्ता हे शेखच्या गाडीचा पाठलाग करत होत़े दादर्पयत शेख त्यांच्या हाती लागला नाही़ अखेर गुप्ता यांनी शेखच्या गाडीचा नंबर टिळक नगर पोलिसांना दिला़ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शेखला 24 तासांच्या आत अटक केली़ या घटनेतील दुर्दैव म्हणजे जाधव याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आह़े आई आणि दोन मोठय़ा भावांसोबत तो राहत होता. तर सुरेशला महिन्याभरापूर्वी वडिलांनी ही दुचाकी भेट दिली होती. (प्रतिनिधी)