Join us

दिव्यांग व्यक्तींपर्यंत अंत्योदय योजनेचे लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 7:57 AM

यादीतून नाव कमी न करण्याचा मानस ; रेशन देण्याचा हेतू

मुंबई : सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत राशन दुकानातून स्वस्त धान्य न घेणाऱ्या ग्राहकांची नावे अंत्योदय अथवा प्राधान्य यादीतून कमी केली जात आहेत. मात्र, मुंबई आणि ठाणे शिधा वाटप क्षेत्रातील अन्नधान्याचे नियतन आणि उचल यातील तफावतीमुळे अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यापेक्षा पात्र व्यक्तींचा या योजनेत समाविष्ट करण्याची संधी मिळते. अलीकडेच विभागाने दिव्यांग व्यक्ति कुटुंबप्रमुख असल्यास त्यांना अंत्यादय योजनेत समाविष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तर, सप्टेंबर महिन्यात११७ अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्ड वितरीत करण्यात आले. तर, ११९९३ प्राधान्य कुटुंब यादी अंतर्गत समावेश करण्यात आला.

मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रातील नियतन आणि उचल यातील वीस टक्के तफावतीमुळे अंत्योदय योजनेत पात्र व्यक्तींना समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही सुलभ ठरते. सहा महिने कालावधीत अन्न धान्य न घेतल्यास अंत्योदय किंवा प्राधान्य यादीतून कमी करण्याचा पर्याय आहे. मात्र, एकदा नाव कमी केल्यास पुन्हा त्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया जटील ठरते. त्यामुळे मानवीय दृष्टीकोनातुकन संवेदनशीलपणे हाताळणी केली जाते. दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असल्यास त्यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार जास्तीतजास्त पात्र व्यक्तींचा यात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाॅकाडाऊनमुळे अधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहचणे अवघड होत आहे. 

दिव्यांग व्यक्ती कुंटुंबप्रमुख असल्यास त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार अंमलबजावणीचे कामही सुरू झाले आहे. - कैलास पगारे, शिधावाटप नियंत्रक, मुंबई 

स्वयंसेवी संस्थांना आवाहनपालिका, आधार कार्डच्या माध्यमातून दिव्यांगापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अपूर्ण पत्त्यामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संचालक नागरी पुरवठा मुंबई कैलास पगारे यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबई