Join us

आवडीचे जेवण मिळाले नाही म्हणून पुतणीच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:59 AM

भावजयीने आवडीचे जेवण बनविण्यास नकार दिला म्हणून तिच्या ३ वर्षांच्या मुलीला लादीवर आपटून तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली

मुंबई : भावजयीने आवडीचे जेवण बनविण्यास नकार दिला म्हणून तिच्या ३ वर्षांच्या मुलीला लादीवर आपटून तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना कांदिवलीत बुधवारी घडली. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी १९ वर्षीय दिराला बेड्या ठोकल्या आहेत.कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात शरीफ मुस्तफा सहा (२४) हे पत्नी, ३ वर्षांची मुलगी गुडिया आणि भावाच्या कुटुंबासह राहतात. बुधवारी सायंकाळी ७च्या सुमारास शरीफच्या भावाने भावजयीला मांसाहारी जेवण बनविण्यास सांगितले. मात्र त्यांनी काही कारणास्तव मांसाहारी जेवण बनवण्यास नकार दिला. याच राग आल्याने त्यांनी भावजयीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.रागाच्या भरात त्याने भावजयीच्या मुलीला जोरात लादीवर आपटले. यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.घटनेची वर्दी लागताच कांदिवली पोलिसांनी शरीफच्या भावाला अटक केली. नेमके काय घडले, जेवणावरूनच हा वाद घडला की आणखी काही कारण आहे, या प्रकरणी नेमके कोण खरे बोलत आहे, याबाबत आम्ही अधिक तपास सुरू केल्याची माहिती कांदिवली पोलिसांनी दिली.दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गुडियाची प्रकृती चिंताजनक असल्याचे तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले.