पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Published: January 30, 2015 03:11 AM2015-01-30T03:11:14+5:302015-01-30T03:11:14+5:30
शिवडी, रेल्वे फाटकाजवळील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावर सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला
मुंबई : अजून १२ रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात मान्य केले़
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ याआधी १४ रेल्वे स्थानकांवर ही केंद्रे सुरू करणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे़ मात्र या स्थानकांव्यतिरिक्त अजून १२ रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने तेथेही या केंद्रांची आवश्यकता असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर रेल्वेने या रेल्वे स्थानकांवरही ही सेवा केंद्रे सुरू केली जातील, असे न्यायालयाला सांगितले़ त्याचवेळी राज्य शासनानेही स्थानकांजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिका सुसज्ज आहेत, असे न्यायालयाला सांगितले़ त्यावर न्यायालयाने शासनाचे कान उपटले़ या रुग्णवाहिकेत कधी चालक नसतो तर कधी डॉक्टर नसतो़ याने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात नेता येत नाही़ आणि तरीही या रुग्णवाहिका सुसज्ज असल्याचा दावा करत असेल तर ते गैर आहे़, असे सांगत ही सुनावणी ५ मार्चपर्यंत तहकूब केली़ (प्रतिनिधी)