सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न!

By admin | Published: June 20, 2014 01:58 AM2014-06-20T01:58:17+5:302014-06-20T01:58:17+5:30

दोन मोठय़ा स्फोटांनी नुकसान झालेल्या भारतीय नौदलाच्या पाणबुडी सिंधुरक्षकला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नौदलाकडून करण्यात येत आहेत.

Attempts to save Sindhurakkara! | सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न!

सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न!

Next
>मुंबई : दोन मोठय़ा स्फोटांनी नुकसान झालेल्या भारतीय नौदलाच्या पाणबुडी सिंधुरक्षकला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नौदलाकडून करण्यात येत आहेत. स्फोटांमुळे सिंधुरक्षकला अंतर्गत भागात मोठे नुकसान झाले असून, नौदलाच्या तज्ज्ञ समितीकडून या पाणबुडीची पाहणी केली जात आहे. तज्ज्ञांच्या पाहणीनंतर त्याचा अहवाल संरक्षण मंत्रलयाला सादर केला जाणार असून, त्यानंतर ही पाणबुडी नौदलात सामील करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. 
14 ऑगस्ट 2क्13 रोजी मुंबईतील डॉकयार्डमध्ये उभ्या असणा:या सिंधुरक्षक पाणबुडीवर दोन शक्तिशाली स्फोट झाले. अंतर्गत भागात झालेल्या या स्फोटामुळे या पाणबुडीला जलसमाधी मिळाली होती; तर पाणबुडीत असणा:या नौदलांच्या 18 कर्मचा:यांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील 11 कर्मचा:यांचेच मृतदेह नौदलाला सापडले. इतर सात मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. 
सिंधुरक्षक पाणबुडी अपघाताचे नेमके कारण काय, हे शोधण्यासाठी नौदलाकडून एक तज्ज्ञ समितीही नेमण्यात आली. 15 दिवसांपूर्वीच या पाणबुडीला बाहेर काढण्यात आले. तेव्हापासून ही समिती पाहणी करीत आहे. साधारण दोन महिने चालणा:या या पाहणीनंतर त्याचा अहवाल संरक्षण मंत्रलयाला देण्यात येणार आहे. त्यानंतर या पाणबुडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
2क्1क्मध्येही अपघात
च्1997 साली भारतीय नौदलात सामील झालेल्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीवर फेब्रुवारी 2क्1क्मध्ये स्फोटानंतर आग लागली होती. तेव्हा ही पाणबुडी विशाखापट्टणम् येथील नौदल केंद्रात होती. यात एक जवान 
ठार तर दोन जखमी झाले होते. 
या अपघातानंतर रशियामध्ये 
पुन्हा डागडुजी करण्यात आली 
तेव्हा तब्बल 45क् कोटी खर्च 
झाला होता. 
 
90}
भागात नुकसान : याबाबत नौदलातील सूत्रंनी सांगितले की, सिंधुरक्षक पाणबुडीत झालेल्या दोन मोठय़ा स्फोटांमुळे त्यामधील अंतर्गत भागात मोठे नुकसान झाले आहे. त्याचे फक्त इंजिन आणि इतर काही छोटे तांत्रिक भागच कार्यरत आहेत. मोठय़ा प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत राहील की नाही ही शंकाच आहे. तब्बल 9क् टक्के अंतर्गत भागात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याची डागडुजीचा निर्णय झाल्यास त्याला मोठा खर्चही येण्याची शक्यता आहे. या सर्व बाजूंचा विचार केला जाणार आहे. 
 
73े31
लांबीच्या पाणबुडीचे एकूण वजन 31क्क् टन इतके होते. 3क्क् मीटर समुद्रखोलीतून ही पाणबुडी सहज काम करू शकत होती. त्यामुळे या पाणबुडीचा नौदलातील अद्यावत पाणबुडींमध्ये समावेश होता. या पाणबुडीचा वेग ताशी 17 सागरी मैल इतका होता. 
 
23000े31
या पाणबुडीवर 23 हजार मीटर्पयत ताशी 15क्क् किलोमीटर इतक्या वेगाने मारा करणारी 9 एम 36 स्ट्रेला-3 ही मिसाईल्स होती. ही मिसाईल्स पाण्यातून पाण्यात आणि पाण्यातून हवेत मारा करणारी होती. यासोबत एखाद्या युद्धनौकेला किंवा पाणबुडीला उद्ध्वस्त करेल अशी 3 एम 54 क्लब एस आणि 53-65 पॅसीव्ह वेक हॉपिंग टॉरपॅडो ही मिसाईल्सही होती.
 

Web Title: Attempts to save Sindhurakkara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.