घरदुरुस्तीदरम्यान खोलीत जमा केलेले सामान पळविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:06 AM2020-12-25T04:06:02+5:302020-12-25T04:06:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घराची दुरुस्ती सुरू असल्याने मालकाने सगळे सामान एकाच खोलीत भरून ठेवले आणि चोरांच्या टोळीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घराची दुरुस्ती सुरू असल्याने मालकाने सगळे सामान एकाच खोलीत भरून ठेवले आणि चोरांच्या टोळीने ते सर्व रातोरात लंपास करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरे पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावत तिघांच्या मुसक्या आवळल्या.
श्रीनिवास खरात (२८), शेखर दुमला (२३) आणि संतोष साळुंखे (२३) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अनुप बतवार हे रॉयल पाममध्ये त्यांच्या २५ क्रमांकाच्या बंगल्यात राहत असूनही त्याच्या दुरुस्तीचे काम त्यांनी काढले होते. त्या दरम्यान त्यांनी घरातील टीव्ही, फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तू एका खोलीत जमा केल्या होत्या. ज्या चोरांनी संधी साधत पळविण्याचा कट रचला. ते २१ डिसेंबरच्या रात्री चोरी करणार असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली व ती त्यानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. चोरीचे सामान त्यांनी एका झोपडीत लपविले होते, ज्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.