Join us

धर्माच्या नावावर देश तोडण्याचा प्रयत्न सफल होणार नाही : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 21:23 IST

देशात मागील काही वर्षांत धर्मा धर्मात फूट पाडून देश तोडण्याचे काम धर्मांध शक्ती प्रयत्न करत आहेत, नाना पटोले यांचं वक्तव्य.

“देशात मागील काही वर्षांत धर्मा धर्मात फूट पाडून देश तोडण्याचे काम धर्मांध शक्ती प्रयत्न करत आहेत. हा देश हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई सर्व धर्मियांचा आहे. ज्या विभाजनवादी शक्ति द्वेषाचे विष पेरून देशात फूट पाडू पहात आहेत, त्यात ते सफल होणार नाहीत,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

इस्लाम जिमखाना येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती, यावेळी सर्व धर्माचे धर्मगुरू तसेच इराक, इराण अफगाणिस्तान, येमेन या देशांच्या राजदूतांसह विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख,  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि मान्यवर उपस्थित होते.

“आज देशात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात असताना आजची ही इफ्तार पार्टी सर्वधर्मसमभावचा संदेश देणारी आहे. धर्मा धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आजची इफ्तार पार्टी खऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करणारी आहे. देश सर्वांच्या संघर्षाने व अनेक स्वातंत्र्यसोनिकांच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला. देशात सर्व धर्माचे लोक रहात आहेत पण त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काही पक्ष व संघटना करत आहेत त्यांना लोक धडा शिकवतील,” असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेस