जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:15 AM2020-12-04T04:15:10+5:302020-12-04T04:15:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुणबी जातीच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी सुनावणीस उपस्थित राहण्याची नोटीस कांदिवली पूर्वच्या वाॅर्ड क्र.२८चे शिवसेना ...

Attend for caste certificate verification! | जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा!

जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुणबी जातीच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी सुनावणीस उपस्थित राहण्याची नोटीस कांदिवली पूर्वच्या वाॅर्ड क्र.२८चे शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे यांना जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे कार्यालयाकडून बजाविण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना ४ डिसेंबर रोजी समितीसमोर उभे राहावे लागणार असून याआधी कारणे दाखवा नोटीसही त्यांना बजाविण्यात आली होती.

नगरसेवक हुंडारे यांनी तीन महिन्यांपूर्वीच वाॅर्ड क्र.२८ चे नवनियुक्त नगरसेवक म्हणून पदभार स्वीकारला. मात्र त्यांच्या जातीचा दाव्याच्या वैधतेबाबत समितीची खात्री पटलेली नसल्याने, त्यांना (२००१चा महाराष्ट्र अधिनियमन क्र.२३) कलम ८ प्रमाणे दावा सिद्ध करावा लागणार आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीविषयी एका तक्रारदाराने आक्षेप घेतल्याने हुंडारे यांना जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस २३ ऑक्टोबर रोजी बजाविण्यात आली होती. त्यासाठी हुंडारे उपस्थित झाले होते. परंतु त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांबाबत समितीने मूल्यमापन करत काही आक्षेप नोंदविले आहेत. याबाबत खुलासा करण्यासाठी त्यांनी हजर राहणे अनिवार्य असेल. त्यांच्या आधी वाॅर्ड क्र. २८ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक राजपत यादव यांचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणीमध्ये अवैध ठरल्याने त्यांना नगरसेवकपद सोडावे लागले होते. आता शिवसेनेच्या हुंडारे यांच्यावरही आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचेही नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

Web Title: Attend for caste certificate verification!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.