उपस्थिती १०० टक्के; मात्र जबरदस्तीने सुट्टीचे अर्ज मागितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 02:19 AM2020-06-11T02:19:11+5:302020-06-11T02:19:22+5:30

नाहक त्रास दिला जातोय : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा आरोप

Attendance 100 percent; But forcibly applied for leave | उपस्थिती १०० टक्के; मात्र जबरदस्तीने सुट्टीचे अर्ज मागितले

उपस्थिती १०० टक्के; मात्र जबरदस्तीने सुट्टीचे अर्ज मागितले

Next

मुंबई : राज्यातील नॉन रेड झोनमधील जिल्ह्या-जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू आहे. मात्र या सेवेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने अत्यंत कमी प्रमाणात एसटीच्या फेऱ्या चालविल्या जात आहेत. ऐनवेळी प्रवासी नसल्याने फेºया रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे १०० टक्के उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही. परिणामी, अशा चालक-वाहकांकडे रजा अर्जाची मागणी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांकडून केली जात आहे.
राज्यभरातील प्रत्येक आगारात आणि डेपोत असे प्रकार सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने केला आहे. एसटी महामंडळाला जिल्ह्यांतर्गत बस सेवा चालू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यानंतर आगार व विभागीय कार्यशाळेत सर्व कर्मचाºयांना हजर राहण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्तव्यावर उपस्थित न राहिलेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे १०० टक्के कर्मचारी आगारामध्ये उपस्थित राहत आहेत. कर्मचाºयांना कोणतेच काम नसल्याने रजा अर्जाची मागणी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांकडून केली जात आहे.
लॉकडाऊन काळात राज्य सरकारने रजेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसतानाही राज्यभरातील अनेक विभागांत रजेचे अर्ज घेतले जात आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केला आहे. १०० टक्के उपस्थितीमुळे चालक, वाहक विश्रामगृहात जागा अपुरी पडत आहे. अस्वच्छ विश्रामगृहाने आणि मास्क, सॅनिटायझरचे वाटप होत नसल्याने कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहत आहे.

लॉकडाऊन काळातील हजेरी ग्राह्य धरण्यात यावी
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर झाला आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभाग वगळता इतर विभागांत प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांना काम न मिळाल्यास रजेचे अर्ज न घेता लॉकडाऊन काळातील हजेरी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Attendance 100 percent; But forcibly applied for leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.