अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानभवन कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता ५० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 02:36 AM2020-07-14T02:36:17+5:302020-07-14T02:36:39+5:30

१५ टक्के शासकीय कर्मचा-यांनी कार्यालयात उपस्थित राहावे असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला होता. तो विधानभवन कर्मचा-यांसाठीही होता.

The attendance of Vidhan Bhavan staff for the preparation of the convention is now 50 per cent | अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानभवन कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता ५० टक्के

अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानभवन कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता ५० टक्के

googlenewsNext

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ टक्क्यांऐवजी ५० टक्के करण्यात आली आहे.
१५ टक्के शासकीय कर्मचा-यांनी कार्यालयात उपस्थित राहावे असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला होता. तो विधानभवन कर्मचा-यांसाठीही होता. मात्र अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी त्यांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. निम्मे कर्मचारी सोमवार, बुधवार, शुक्रवारी उपस्थित राहतील तर निम्मे कर्मचारी मंगळवार, गुरुवारी उपस्थित राहतील. जे पहिल्या आठवड्यात मंगळवार, गुरुवारी येतील ते नंतरच्या आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवारी उपस्थित राहतील. अधिवेशन ३ आॅगस्टपासून सुरू होण्याच्या दृष्टीने विधानमंडळ सचिवालय पूर्वतयारी करत आहे. आसन व्यवस्था शारीरिक अंतर राहील अशा पद्धतीने असेल. अडचण आल्यास सेंट्रल हॉलमध्ये कामकाज चालवण्याचा पर्याय तपासून पाहिला जात आहे.

Web Title: The attendance of Vidhan Bhavan staff for the preparation of the convention is now 50 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.