गोळीबारासाठी शस्त्रे पुरविणारा अटकेत

By admin | Published: February 25, 2016 03:05 AM2016-02-25T03:05:14+5:302016-02-25T03:05:14+5:30

चुनाभट्टी येथील अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ या गुन्ह्यांसाठी शस्त्रसाठा

Attendant for firearms | गोळीबारासाठी शस्त्रे पुरविणारा अटकेत

गोळीबारासाठी शस्त्रे पुरविणारा अटकेत

Next

मुंबई: चुनाभट्टी येथील अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ या गुन्ह्यांसाठी शस्त्रसाठा पुरविणाऱ्या राकेशकुमार देवेंद्र उर्फ राजेश (३४)ला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह या गुन्ह्यांतील पसार आरोपी उमेश फल्ले (३५)च्याही मुसक्या आवळल्या.
सायन ट्रॉम्बे रोडवरील त्रिमूर्ती सोसायटीतील अरिहंत ग्रुपच्या कार्यालयात बसलेले जिनेश जैन यांच्यावर ५ फेब्रुवारी रोजी दोन बुरखाधारींनी गोळीबार केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. कंत्राट न दिल्याच्या रागातून सुमित उर्फ पप्पू येरुणकरने हा कट रचल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, येरुणकरसह अजय कारोसी, विनोद विश्वकर्मा उर्फ रेमो आणि बाबुकुमार गुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ सूरज गौंड (२४) ला पोलिसांनी अटक केली होती. त्याची केबल व्यावसायिक असलेल्या राजेश येरुणकरसोबत मैत्री होती. त्याने त्याच्याकडील ह्युंडाई गेट्स कारही दिली होती. त्याच्यासह विकासकाला धमकाविण्यासाठी गेलेला उमेशलाही पोलिसांनी बुधवारी अटक केली. अटक आरोपींकडून ७.६५ बोअरच्या पिस्तुलासह ६ जिवंत काडतुसे, मारुती कार, ह्युंडाई गेट्स कार, मोबाइल, बुरखेही जप्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

नवी मुंबईचे बिल्डर ‘टार्गेट’
सूत्रधार पप्पू उर्फ सुमित येरुणकर याने नवी मुंबईतील दोघा बिल्डरांवर खंडणीसाठी हल्ला करण्याचा कट रचला असल्याची माहिती तपासातून
पुढे आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विनायक वस्त, जगदिश साईल, सहायक निरीक्षक विश्वास पाटील आदी तपास करीत आहेत.

Web Title: Attendant for firearms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.