मुंबई - कायम अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मायानगरी मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी तुटपुंज्या मुंबई पोलिसांच्या मनुष्यबळाच्या खांद्यावर आहे. साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे सध्याचे चित्र आहे. मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के अद्यापही रिक्त आहेत. यात सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के तफावत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वाकोटी आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी मात्र अवघा ४० हजार पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. एका खासगी संस्थेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये मुंबई पोलीस दलात ५० हजार ६०६ पदे मंजूर होती. त्यापैकी ३९ हजार ५६१ जण कार्यरत होते. म्हणजे यात २२ टक्क्यांची तफावत आहे. याच प्रकारे २०१९ मध्ये मुंबईत मंजूर ५० हजार ४८८ पदांपैकी ४१ हजार ११५ जणांचा फौजफाटा कार्यरत आहे. कार्यरत पोलिसांपैकी बंदोबस्तासाठी सर्वाधिक मनुष्यबळ अडकून असते.टेक्निकल पोस्टकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ५ हजार पदे मंजूर असताना अवघ्या २ हजार ८४४ मनुष्यबळावर काम सुरू आहे. याचा फटका गुन्ह्यांचा तपासावर होत आहे.पोलिसांवरील कामाचा अतिरिक्त भार वाढतच आहे. त्यामुळे निदान राज्यभरासाठी होणाऱ्या मेगा पोलीस भरतीतून तरी किमान ही तफावत कमी होईल, अशी आशा पोलिसांना आहे.अशी आहेत रिक्त पदे16%पोलीसनिरीक्षक41%सहायकपोलीस निरीक्षक28%पोलीस उपनिरीक्षक29%सहायक पोलीस उपनिरीक्षककोरोना संकट; जीव गमाविण्याची वेळकोरोनाच्या काळात सर्वाधिक फटका पोलिसांना बसताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये बंदोबस्तावरील राज्यभरातील २० हजार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी २०८ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यात मुंबईतील साडेतीन हजार पोलिसांचा समावेश आहे, तर ६०हून अधिक पोलिसांवर कोरोनामुळे जीव गमाविण्याची वेळ ओढावली आहे.
साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस; मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के अद्यापही रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 2:47 AM