Join us  

लाखोंचा गंडा घालणारा अटकेत

By admin | Published: December 04, 2015 1:54 AM

बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बोलण्यामध्ये गुंतवून, त्यांच्याकडील रोकड लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. आरोपीने मुंबई

मुंबई : बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बोलण्यामध्ये गुंतवून, त्यांच्याकडील रोकड लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. आरोपीने मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी सुमारे १५ ते २० जणांना २३ लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले असून, पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. यापूर्वीही आरोपीला अशाच प्रकरणात शिक्षा झाली असून, शिक्षा भोगल्यानंतरही पुन्हा त्याने असेच गुन्हे केले आहेत.अब्बास ओकानी (३८) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, तो वसई येथे राहातो. गेल्या अनेक वर्षांपासून तो अशाच प्रकारे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना फसवत आहे. बँकेमध्ये खातेधारकांना बोलण्यात गुंतवून, तो त्यांच्याकडील लाखो रुपयांची रोकड लंपास करीत असे.मुंबई, ठाणे, यासह विविध ठिकाणी अशा प्रकारे लुटीच्या घटना घडत असल्याने, गुन्हे शाखा या आरोपीच्या मागावर होती. मंगळवारी हा आरोपी माटुंगा येथील आयसीआयसीआय बँकेत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बँकेत सापळा रचून या आरोपीला अटक केली. अशाच गुन्ह्यामध्ये यापूर्वीही या आरोपीला शिक्षादेखील झालेली आहे. (प्रतिनिधी)