तुंगारेश्वरचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पर्यटकांचे आकर्षण

By admin | Published: June 25, 2015 11:22 PM2015-06-25T23:22:26+5:302015-06-25T23:22:26+5:30

मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेले तुंगारेश्वरचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. तुंगारेश्वर डोंगरातून

Attractions of tourist attractions of Tungaareshwar | तुंगारेश्वरचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पर्यटकांचे आकर्षण

तुंगारेश्वरचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पर्यटकांचे आकर्षण

Next

वसई : मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेले तुंगारेश्वरचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. तुंगारेश्वर डोंगरातून खाली कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये मनसोक्त डुंबायचे व रानावनामधून हिंडायचे, असा येथे येणाऱ्या पर्यटकांचा कार्यक्रम असतो. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांचे पाय तुंगारेश्वर डोंगराकडे वळू लागतात. दिवसभर मौजमस्ती केल्यानंतर घरी परतण्याच्या वेळी या डोंगरावरील शंकराचे दर्शन घेण्यास पर्यटक विसरत नाहीत.
वसईला आलो की, आपण स्वतंत्र रिक्षाने अथवा शेअर रिक्षाने सातिवलीपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर, मात्र बरीचशी वाटचाल पायी करावी लागते.
तुंगारेश्वर डोंगराची सहल म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी असते. मुंबईपासून अवघ्या दीड तासात येथे पोहोचता येते. त्यामुळे दर पावसाळ्यात पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. यंदाही पर्यटकांनी चांगली हजेरी लावली आहे. स्वस्त व मस्त असे या पर्यटनस्थळाचे वर्णन करता येईल. सकाळी ७ च्या सुमारास निघाले की, अवघ्या दीड तासात तुंगारेश्वर डोंगर गाठता येतो. दिवसभर मस्त धबधब्याखाली चिंब भिजायचे व त्यानंतर हिरव्यागार डोंगरावर यथेच्छ हिंडायचे. जवळपासच्या ढाब्यावर जेवणाची चांगली व स्वस्त दरात व्यवस्था होते. गेल्या काही वर्षांत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत अनेक ढाबे निर्माण झाले असून या ढाब्यांवर मांसाहारी व शाकाहारी पदार्थ अल्पदरात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात या परिसरात अंधार लवकर पडतो. त्यामुळे साडेतीन-चारलाच परतीच्या मार्गाला लागणे उत्तम.
या परिसरात बिबळ्या आणि तत्सम श्वापदांचा वावर असल्याने ही दक्षता घ्यावी लागते. तसेच येथील जलप्रवाह डोंगरावर पडणाऱ्या पर्जन्यावर अवलंबून असल्याने त्याचा प्रवाह आणि गती कधीही वाढू शकते, हे लक्षात घेऊनच सावधगिरीने जलक्रीडा करणे श्रेयस्कर ठरते. (प्रतिनिधी)

Web Title: Attractions of tourist attractions of Tungaareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.