कान्हेरी लेण्यांचे पर्यटकांना आकर्षण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 05:01 AM2019-05-05T05:01:34+5:302019-05-05T05:03:29+5:30
बोरीवली राष्ट्रीय उद्यानातील लेणी क्रमांक ३ ही सर्वात मोठी लेणी असून येथे मोठा चैत्य स्तूप उभा आहे.
बोरीवली राष्ट्रीय उद्यानातील लेणी क्रमांक ३ ही सर्वात मोठी लेणी असून येथे मोठा चैत्य स्तूप उभा आहे. बाजूला जे खांब आहेत तेथे राजा आणि राणी ही बुद्ध प्रतीके, बोधिवृक्ष, सिरिपाद, स्तूप यांची हत्तींवर येऊन पूजा करत असतानाचे शिल्प कोरलेले आहे.
सम्राट अशोकांचे मांडलिक सातवाहन राजांच्या कारकिर्दीत कोरलेल्या कान्हेरी गुंफा हा येथील बुद्धकालीन अनमोल लेणी समूह आहे. येथे एकूण १२८ लेणी आहेत. १०७ विहार आणि ५ चैत्यगृहे आहेत.
लेणी प्रवेशद्वाराच्या बाजूला २ अतिभव्य ३२ फूट उंचीच्या बुद्ध मूर्ती आहेत, तसेच बुद्धांच्या अनेक प्रकारच्या ध्यानमुद्राही प्रवेशभिंतीवर कोरलेली आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक लेणी पाहण्यासाठी येतात. कान्हेरीला ‘कान्हागिरी’ किंवा ‘कृष्णगिरी’ असेही म्हटले जाते.