विद्यार्थिंनींनी काढल्या आकर्षक रांगोळ्या
By Admin | Published: June 28, 2015 09:21 PM2015-06-28T21:21:13+5:302015-06-28T21:21:13+5:30
घाटनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक कृष्णा दहेतकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला; तर सुरेश निकम, दामू मोरे यांनी श्रीफ ळ फोडून अभिवादन केले.
घ टनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक कृष्णा दहेतकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला; तर सुरेश निकम, दामू मोरे यांनी श्रीफ ळ फोडून अभिवादन केले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थिंनींनी आकर्षक रांगोळ्या काढून बक्षीसे जिंकली. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. यामध्ये ९वी, १० व ६ वीच्या विद्यार्थिंनी अपूर्वा निकम, रोहिणी चौधरी, रुद्राक्षी गुळवे, वैष्णवी कोठाळे यांनी बक्षीसे जिंकली. यावेळी ईश्वर तांगडे, दामू मोरे, मुरकुटे, रूपेश चौरे, सुधाकर मोटे, रायसिंग, सुवर्णा बोरकर, सपना दिंगे आदी शिक्षकांची उपस्थिती होती.