Join us

महापालिका शाळांच्या साफसफाई कंत्राटात घोटाळा, अतुल भातखळकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 3:36 AM

Mumbai News : महापालिकेच्या शिक्षण विभागाकरता मुंबई मधील २४ विभागातील महापालिका शाळांमध्ये पुढील तीन वर्षांकरत निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई स्वच्छता आणि परिचारक मनुष्यबळ पुरवण्या करता निविदा मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत मागविण्यात आल्या आहेत. 

-  मनोहल कुंभेजकर मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागाकरता मुंबई मधील २४ विभागातील महापालिका शाळांमध्ये पुढील तीन वर्षांकरत निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई स्वच्छता आणि परिचारक मनुष्यबळ पुरवण्या करता निविदा मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत मागविण्यात आल्या आहेत. सदर  काम हे अतांत्रिक आणि अकुशल कामगारांकडून केले जाऊन शकते, इतकेच नव्हे तर पूर्वांपार व आजमिती पर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांद्वारे केले जाणारे काम एकत्रित करून ठराविक कंत्राटदारांना मदत करण्याची भूमिका दिसत आहे आणि अशा प्रकारे सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करून निविदा बनविणाऱ्या संबंधित खाते प्रमुख आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची निःपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे व सदरहू निविदा विभाग कार्यालय स्तरावर मागवून स्थानिक मजूर सोसायट्यांना काम दिल्यास अनेक बेरोजगार हातानं काम मिळेल या करता अनावश्यक आणि ठराविक कंत्राटदारांना फायदेशीर असलेली निर्जंतूकीकरण, साफसफाई स्वच्छता आणि परिचारक मनुष्यबळ पुरवण्या करता मागविण्यात आलेली निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी, या प्रकरणी कठोर कारवाई करुन, सदर साटेलोटे व हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यंविरोधात चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार, पक्ष प्रवक्ते सुनिल प्रभु यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.त्यामुळे बृहन्मुंबई महानगपालिकेला आर्थिक लाभ होईल व सामान्य मुंबईकरांच्या खिशातून जमा केलेला कररुपी पैसा वाचेल, असा विश्वास आमदार सुनिल प्रभु यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.खरेतर कोरोना कालावधीत खाजगी कंत्रादारांपेक्षा महापालिका कीटक नाशक विभागाने उत्कृष्ठ काम केले असून महापालिकेच्या शाळांमध्ये देखिल महापालिका कीटक नाशक विभागामार्फत काम करणे गरजेचे आहे. या निविदेत प्रस्तावित  नमूद कामे ही शाळेचे शिपाई, हमाल आणि माळी तथा पर्यवेक्षक पूर्वांपार करत आलेले आहेत आणि अजूनही करतात असे आमदार प्रभु यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. ठरावीक कंत्राटदारांसाठी निविदा रचलीnया निविदा तयार करताना काही ठरावीक कंत्राटदारांना डोळ्यांसमोर ठेवून निविदा रचली असून कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण शब्द पहिला लिहून अनावश्यक आणि वर्षानुवर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणारी कामे एकत्रित करून मागविण्यात आलेली निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. nत्यानुसार महापालिका आयुक्तांनी निविदा पुढे ढकलली असून त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :शाळामुंबई महानगरपालिकाअतुल भातखळकर