मुंबई : कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच राज्यासह देशातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरिता विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व जलद लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेकडे ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून पालिकेची आर्थिक स्थितीही सक्षम आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेमार्फत लस खरेदी करून मुंबईतील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे, अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. (Atul Bhatkhalkar demands free vaccine for all 18 to 44 year olds)२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ५८ लाख ५० हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून ४५ वर्षे वयापेक्षा वरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची आवश्यकता आहे. या लसीकरण मोहिमेसाठी लागणारा इतर खर्च व व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन मदत करतील. तसेच, ज्या नागरिकांकडे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा असेल अशा व्यक्तींचे यातून प्राधान्याने लसीकरण केल्यास पुढील काही महिन्यात हे लसीकरण पूर्ण होऊन मुंबई कोरोनामुक्त करता येईल. मुंबईत कोरोनाची तिसरी व चौथी लाट येणार असून रुग्णसंख्या अधिक वाढण्याची भीती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेतर्फे तत्काळ ही लस खरेदी करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ५८ लाख ५० हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून ४५ वर्षे वयापेक्षा वरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जात आहे.