Join us

Raj Thackeray : ...तेव्हा तर भाजपाचे अतुल भातखळकर मनसेचं तिकीट मागायला आले होते; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 6:22 PM

MNS Raj Thackeray: Atul Bhatkhalkar had asked for MNS ticket in 2009 election भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

MNS Raj Thackeray: भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते एका वेबिनारमध्ये बोलत होते.

मनसेच्या पक्ष बांधणीसाठी तितकेच चांगले नेते पक्षात हवे असतात पण आजवर अनेक नेते मनसेला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सध्याचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं याची माहिती दिली. MNS Raj Thackeray: Atul Bhatkhalkar had asked for MNS ticket in 2009 election

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?"मनसेला नेते सोडून गेले असं अनेकदा सांगितलं जातं. पण जे सोडून गेले त्यांच्या फक्त एका बातमीशिवाय दुसरं काही झालं का? मला एक असं उदाहरण दाखवून द्यावं. माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. आता पक्षांतराच्या गोष्टी होत असतात. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपमध्ये गेले. त्यांचं काय झालं?", असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

"राज्याच्या २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी तर भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे आले होते. त्यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं. मी नितीन गडकरींना फोन करुन त्यांची समजूत काढली होती की असं करू नका. ज्या पक्षात आहात त्यातच काम करत राहिलं पाहिजे", असं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :राज ठाकरेअतुल भातखळकरभाजपा