Join us

एचडीआयएलच्या मालमत्तांचा होणार लिलाव; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 1:17 AM

प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती, गुंतवणूकदारांना दिलासा

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. त्यानुसार, या लिलाव प्रक्रियेसाठी त्यांनी प्रशासकीय अधिकाºयाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत ९ लाख गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरबीआयने गेल्या महिन्यात पीएमसी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यामुळे लाखो गुंतवणूकदार रस्त्यावर उतरले. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेसह सक्तवसुली संचालनालयाकडूनही तपास सुरू आहे. एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवन आणि त्याचा मुलगा सारंग यांनी पीएमसी बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या संगमताने ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा केला आहे, तसेच त्यांच्या २१ हजार आभासी खात्यांबाबत तपास सुरू आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव व्हावा, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात गेल्या आठवड्यात अर्ज केला होता. यावर वाधवा पिता-पुत्रानेही ना हरकत प्रमाणपत्र दिले.

त्यानुसार, आरबीआयने या मालमत्तांचा लिलाव करण्यास ग्रीन सिग्नल देत, लिलाव प्रक्रियेसाठी त्यांनी जे. बी. बोहरिआ यांची नियुक्ती केली आहे. बोहरिया यांनी बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेला लेखी अर्जाद्वारे पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील मालमत्ता लिलावासाठी मोकळी करण्याबाबत सांगितले आहे, तसेच त्यांनी जप्त केलेल्या मालमत्तांच्या मूल्यांकनासही सुरुवात केली आहे. यातील एक टप्पा पूर्ण झाल्याचे समजते.

प्रथमदर्शनी आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएलच्या जप्त केलेल्या ४ हजार कोटींच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत येत्या दोन दिवसांत किल्ला कोर्टात अर्ज देत, कोर्टाच्या आदेशानंतर ही मालमत्ता लिलावात काढण्यात येईल. गुंतवणूकदारांचे हित जपणाºया कायद्यांतर्गत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत एचडीआयएल पिता-पुत्रासह पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग, माजी व्यवस्थापक जॉय थॉमस यांच्यासह बँकेच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. यात, वाधवा पिता-पुत्र कर्जाची परतफेड करणार नसल्याचे माहिती असतानाही थॉमसने त्यांना कर्ज मंजूर केल्याचे समोर आले आहे.वाधवा पिता-पुत्राची ३,५०० कोटींची मालमत्ता जप्तवाधवा पिता-पुत्राच्या वसई, नालासोपारा, ठाणे येथील सुमारे ३ हजार ५०० कोटींची स्थावर मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. या मालमत्ता त्यांनी बँकेकडे गहाण ठेवल्या होत्या, शिवाय दोन विमाने, १४ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या मालमत्तांचाही लिलावात समावेश असणार आहे. अशा प्रकारे एकूण ४ हजार कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होणार असल्याची माहिती अधिकाºयांकडून मिळाली.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपीएमसी बँक