मुंबई : झोपलेले रेल्वे प्रशासन सीएसएमटी येथील हिमालय पुलांच्या दुघर्टनेने जागे झाले असून आता २३ पुलांचे ऑडिट करणार आहे. आयआयटी, पालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन मिळून हे काम करणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील हद्दीच्या वादामुळे विनाकारण मुंबईकरांचा मृत्यू होतो. गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळील हिमालय पूल कोसळल्याने ६ नागरिकांचा मृत्यू आणि ३४ नागरिक जखमी झाले. या घटनेत पालिका आणि रेल्वे प्रशासन घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. मात्र हिमालय पूल पालिकेचा असल्याचे सिद्ध झाल्याने रेल्वे प्रशासनाला आलेला ताण कमी झाला.पालिकेचा पादचारी पूल पडल्याने रेल्वे प्रशासन सावध होऊन २३ पुलांची सुरक्षेची तपासणी करणार आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील २७६ पुलांपैकी २९९ पुलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापैकी ओव्हर ब्रीज ८९, पादचारी पूल १९१ आहेत.यापैकी ८१ ओव्हर ब्रीज आणि १७८ पादचारी पुलांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे, तर इतर १९ पुलांपैकी १७ पुलांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २३ पुलांचे आॅडिट करण्यात येणार असल्याचीमाहिती मध्य रेल्वे प्रशासनांनी दिली आहे.अंधेरीतील गोखले पूल पडले, एल्फिन्स्टन रोड येथे चेंगराचेंगरीमध्ये २३ जणांचा प्राण गेला आणि गुरुवारी झालेल्या सीएसएमटी येथील पादचारी पूल पडल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. हे प्रशासनाचे अपयश आहे. पुलांचे स्ट्रक्चरल आॅडीट करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींना निलंबित केले पाहिजे. दरवर्षी स्ट्रक्चरल आॅडीट होते, मात्र तरी देखील अशा घटना घडतात. यामध्ये काहीतरी गडब असून, पाणी कुठेतरी मुरते आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख देण्यात आले, मात्र त्यामुळे परिवारातील महत्त्वाच्या माणसांची उणीव भरून काढणे अशक्य आहे.- समीर झवेरी, माहिती अधिकार कार्यकर्त
रेल्वे २३ पुलांचे ऑडिट करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 5:50 AM