Join us

जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे

By सचिन लुंगसे | Published: May 15, 2024 9:18 AM

या फलकांचा कालावधी ५ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत आहे.

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात लावण्यात आलेल्या लोखंडी जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात असून, ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ९९ ठिकाणी १३८ लोखंडी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांचा कालावधी ५ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत आहे. या फलकांचा आकार हा १०० बाय ४० चौरस फूट आहे.

याचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. अभियांत्रिकी विभागाकडून हे काम केले जात असून, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या सूचनेनुसार ऑडिटचे काम लवकर पूर्ण केले जाईल. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ११६ ठिकाणी १३७ लोखंडी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

फलकांचा आकार १२२ बाय १२० चौरस फूट आहे. याचेही स्ट्रक्चरल ऑडिट नियमितपणे केले जाते. मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा भाग म्हणून तपशीलवार ऑडिट केले जात आहे, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :रेल्वे