मुंबई : पालिकेच्या कामकाजाचे पूर्वीप्रमाणेच २५ टक्के आॅडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ आॅडिटचे प्रमाण दोन टक्क्यांवर आणण्याबाबत काढण्यात आलेले परिपत्रक लवकरच मागे घेण्याची तयारी प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत आज दर्शविली़ मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा असतो़ मात्र पालिकेच्या कामकाजाचे केवळ २५ टक्के आॅडिट करणे शक्य होत असते़ हे प्रमाणही दोन टक्क्यांवर आणण्याचा निर्णय परिपत्रकाद्वारे प्रशासनाने घेतला होता़ याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते़ कामकाजांचे आॅडिट न झाल्यास अधिकाऱ्यांना रान मोकळे मिळून करोडोंची वसुली थांबेल, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली होती़ लेखापरीक्षण विभागातील मनुष्यबळ कमी करून या विभागाला टाळे लावण्याची तयारीही प्रशासनाने केल्याचे आरोप होत होते़ अखेर या निर्णयावर टीका होताच दोन टक्के आॅडिटचे परिपत्रक मागे घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी आज स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
पालिका कामकाजाचे आॅडिट २५ टक्क्यांवरच
By admin | Published: September 11, 2014 1:27 AM